भरधाव चारचाकीने उडवल्याने अयोध्या नगरातील दुचाकीस्वार जखमी

A two-wheeler injured in a collision with a speeding four-wheeler in Bhusawal भुसावळ : भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल देवयानीजवळ बुुधवारी सकाळी 7.45 वाजता घडली.

बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल
तक्रारदार संतोष रामदास शेळके (41, अयोध्या नगर, जळगाव) हे दुचाकीने जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी (एम.एच.15 ई.ई.2070) वरील चालक अनिल राजपूत (सिडको, नाशिक) याने धडक दिल्याने शेळके हे जखमी झाले तर दुचाकीचे नुकसान झाले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक तुषार पाटील करीत आहेत.