भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

0

खडका गावातील दुर्दैवी घटना; कालीपिलीचालक अटकेत

भुसावळ: भरधाव जीपने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना तालुक्यातील खडका येथे गुरुवारी सकाळी घडली. या घटनेत कल्पेश दिलीप फिरके (20, रा.किन्ही) हा तरुण ठार झाला. कालीपिली चालकास तालुका पोलिसांनी अटक केली आहे.