भरधाव टेम्पोची 14 वर्षाच्या मुलाला धडक

0

कल्याण : कल्याण तिसगाव परिसरात संतोष नगर येथील वर्ष अपार्टमेंट मध्ये राहणारा आदित्य गुप्ता हा विद्यार्थी काल सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास लोकग्राम परिसरातून पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या तीन चाकी टेम्पोने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला .

या प्रकरणीकोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी टेम्पो वाहन हयगयीने व बेदरकार पणे चालवत अपघात केल्याचा ठपका ठेवत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .