भरधाव ट्रकची कारला धडक : एकाचा जागीच मृत्यू

Wrong side truck collides with a car: Bhusawal youth dies  जळगाव : जळगावहून भुसावळकडे राँग साईडने जाणार्‍या भरधाव ट्रकने कारला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात भुसावळातील 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 9 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास फोर्ड शोरुम जवळ घडला. या अपघातात नरेंद्रसिंग अमरसिंग राजपूत (32, रा. भुसावळ) हा तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मालवाहू ट्रकच्या धडकेने अपघात
जळगावकडून भरधाव वेगाने ट्रक (जी.जे.13 ए.एक्स 9495) हा रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करीत राँगसाईने भुसावळकडे जात असताना भुसावळकडून येणार्‍या कार (एम.एच.27 बी.झेड. 9382) ला ट्रकने जोरदार धडक दिली. रविवारी रात्री फोर्ड शोरुमच्या अलीकडे हा अपघात घडला. ही धडक इतकी जोरदार होती की, कारमध्ये क्लीनर साईडला बसलेले नरेंद्रसिंग अमरसिंग राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी जखमीच्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरुद्ध नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.