भरधाव ट्रकची ट्रॉलाला धडक : राजस्थानचा चालक गंभीर जखमी

0

भुसावळ- तालुक्यातील दर्यापूर फाट्याजवळ ओव्हरटेकच्या नादात भरधाव ट्रकने ट्रालाला धडक दिल्याने ट्राला चालक गंभीर जखमी झाल्याची घटना 19 रोजी रात्री 10 वाजता घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुरुवारी मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. महिपाल भंवरलाल विष्णोई (रा.रावत, ता.बिल्लाळा, जि.ज्योतपूर, राजस्थान) यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्यावरून ट्रक चालक आरोपी जगन संजय देवरे (26, वडजी, ता.भडगाव, जि.जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराचे भाऊ चालक सोमराज भंवरलाल विष्णोई (रा.रावर, ता.बिल्लाळा) हे ट्राला (आर.जे.19 बी.जी.9775) घेवून जात असताना दर्यापूर फाट्याजवळ ओव्हरटेकच्या नादात ट्रक (एम.एच.18 बी.जे.9853) ने धडक दिल्याने चालक सोमराज गंभीर जखमी झाले. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असू तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.