भरधाव ट्रकची दुचाकीला धडक : यावलच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

यावल : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने यावलच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला अन्य एक जण जखमी झाला. भुसावळ मार्गावरील भुसावळ नाक्यावर रविवारी सकाळी 11 वाजता हा अपघात झाला. शेख शकील शेख ईबा (47, आठवडे बाजार, यावल) असे मयताचे नाव आहे.

अपघातानंतर ट्रक चालक पसार
यावल-भुसावळ मार्गावरील जुने भुसावळ नाक्यावर रविवारी सकाळी 11 वाजता शेख शकील शेख ईबा (मिस्त्री) व दहिगाव येथील मेहमुद खान फकीरा खान (52) हे दोन्ही बांधकाम कारागीर भुसावळकडे कामाला जात असताना भुसावळकडून यावलच्या दिशेने येणार्‍या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघातात दोघे जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारार्थ हलवत असताना शेख शकील शेख ईबा यांचा भुसावळजवळ रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला तर मेहमुद खान फकीरा खान (52) यांना उपचारार्थ हलवण्यात आले. जखमीवर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिळके, अधिपरीचारिका निलीमा पाटील, आरोग्य सेवक कादर तडवी यांनी प्रथमोपचार करीत अधिक उपचारासाठी जळगाव येथे हलवले.