बोहर्डी फाट्यावर अपघात ; अन्य महिला जखमी
वरणगाव- भरधाव ट्रकने रुग्ण घेवून जाणार्या रुग्णवाहिकेलाच धडक दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डी फाट्याजवळ शनिवार, 30 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या अपघात प्रकरणी ट्रक चालकाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रुग्णाला गाठले मृत्यूने !
मुक्ताईनगरकडून वरणगावकडे येणारा ट्रक (क्रमांक के.ए 07-7371) वरील चालकाने वरणगावकडून मुक्ताईनगरकडे जाणारी रुग्णवाहिका (क्रमांक एम.एच.19 सी.वाय.2319) ही ला काहुरखेडा गावाजवळील रस्त्याच्या वळणावर जोरदार धडक दिल्याने रुग्ण वाहिकेतील रुग्ण सुभाष कालू काळे (60, रा.मुक्ताईनगर) यांचा जागीच मृत्यू झाला तर रुग्णवाहिकेतील संगीताबाई रवींद्र बुंदेले (जळगाव) या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनला संदीप गजानन पोळ (23, रा.मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.