एमआयडीसी पोलिसात ट्रक चालकाविरोधात गुन्हा
जळगाव – शाळेची मुले घेण्यासाठी गोदावरी महाविद्यालयातकडे जात असलेल्या रुस्तमजी शाळेच्या स्कूल बसला समोरून येणार्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने स्कूल बस मधील तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. जखमी विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने ही बस पुलाच्या कठडयाला घासली गेली अन्यथा बस पुलाखाली कोसळून अनर्थ घडला असता,
याबाबत माहिती अशी की, रुस्तमजी शाळेची बस (क्रमांक एमएच 19 वाय 6005) वर ललित मोहन धिंगे वय 42 रा.रामेश्वर कॉलनी हे दहा वर्षांपासून चालक म्हणून काम करत आहे. नेहमीप्रमाणे शाळेचे चौथी व पाचवीचे विद्यार्थी घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास कालिंका माता मंदिराच्या समोरून जात होते. यादरम्यान हॉटेल गौरव समोर भुसावळ कडून जळगावकडे जाणारा ट्रक (क्र. एम एच 46 एफ 0121) वरील चालकाचा ट्रकवरील ताबा सोडल्याने ट्रकने सरळ बसवर धडकला.
बसचे नुकसान; सुदैवाने अनर्थ टळला
कालिकांमाता चौकात त्यांनी चौथी तसेच पाचवीच्या वर्गातील बारा विद्यार्थ्यांना बसविले. खेडीजवळील हॉटेल गौरवसमोरील पुलावरून बस जात असताना भुसावळकडून जळगावच्या दिशेने येत असलेल्या एम़एच़ 46 ़एफ ़0121 क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने बसला चालकाच्या साईडने जोरदार धडक दिली़.या धडकेत बसच्या दोन खिडक्यांचे काच फुटले. तसेच लोखंडी रॉडही तुटले. पुलाच्या कठडयाला दुसर्या बाजूने बस घासली गेली. सुदैवाने अनर्थ टळला.
कंटेनर चालकाला पाठलाग करुन पकडल
अपघात होताच स्कूलबस चालक ललित ढेंगे यांनी काही अंतर पुढे जाऊन बस थांबविली़ नंतर धडक देणार्या कंटेनर चालकाचा पाठलाग करून त्यास पकडले़. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. एमआयडीसी पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. कंटेनर चालक गणेश पाटील (मुक्ताईनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चालक ढेंगे यांनी अपघाताच्या घटनेची तात्काळ बस चालकाने माहिती स्कूल प्रशासनाला दिली.
असे आहेत जखमी तिघे विद्यार्थी
या अपघातात बसमधील बसलेले विद्यार्थी आरुष तुषार कोळी, गौरजा विश्वनाथ खडके व विराट सुयोग चोपडे यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. 4 थी तसेच पाचवीच्या इयत्तेत शिकणारे तिघे विद्यार्थी आहेत. यात आरुष याला गुडघ्याला, गौरजा हिला पायाला तर विराट ला डोक्याला डोक्यात दुखापत झाली आहे. तिघांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी ट्रक आणि स्कूल बस पोलिसात जमा केले असून ट्रक चालक गणेश विष्णू पाटील रा. कारकी ता. मुक्ताईनगर याच्याविरोधात ललीत ढेंगे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.