भरधाव ट्रकचे ब्रेक फेल… खांबावर आदळल्याने जीवीतहानी टळली

0

मोहाडी फाट्यावरील घटना ; पोल वाकून वीजतारा तुटल्याने तब्बल 7 तास वीजपुरवठा खंडीत

जळगाव : भरधाव वेगात जाणारा ट्रक रस्त्याच्याकडेला असलेल्या विद्युत खांबावर धडकल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजता शिरसोली रस्त्यावरील गायत्री नगराजवळ घडली. वेळीच चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक खांबावर नेवून धडकल्याने जीवीतहानी टळली. या घटनेत खांब पूर्णपणे वाकला असून विद्युत तारा तुटल्या आहेत. तसेच या भागातील वीज पुरवठा तब्बल सात तास खंडीत झाला होता. महावितरणने युध्दपातळीवर काम करुन रात्री 8 वाजता वीजपुरवठा सुरळीत केला.

याबाबत माहिती अशी की, आयशर ट्रक क्र एम.एच. 04 डी.बी. 0083 ही दि. 30 रोजी सकाळी म्हसावद येथून जळगाव कडे येत असतांना सकाळी 11 वाजेच्या सुमारात ही आशयर ट्रक मोहाडी फाट्याजवळ आली अचानकपणे वाहनाचे ब्रेक फेल झाले. चालकाने प्रसंगावधान राखत समोरुन ये-जा करणार्‍या वाहनांना वाचविण्याच्या ट्रक रस्त्यालगत असलेल्या खांबावर नेवुन धडकला. यानंतर ट्रक थांबला. खांबावर धडकला नसता, हीट अ‍ॅन्ड प्रमाणे मोठी घटना घडून मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान अपघातामुळे खांब वाकून तसेच वीजतारा तुटल्याने महाबळ परिसरातील फिडरवरील अनेक कॉलन्यांचा

ट्रक चालकाविरोधात पोलिसात गुन्हा
या घटनेत विजेचा पोल पूर्णपणे वाकडा होत विजेच्या तारा तुटल्या. दरम्यान, आयशर ट्रक चालक हा घटनास्थळावरुन फरार झाला. विजेच्या तारा तुटल्याने मोहाडी परिसरातील गायत्री नगरासह परिसराचा सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला होता. महावितरणच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी परिश्रम घेत वीज पुरवठा सुरळ्त केला. या घटनेत महावितरणचे जवळपास 50 हजाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी सहाय्यक अभियंता चेतन सोनार यांच्या फिर्यादीवरुन आयशर ट्रक चाकलाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहे.