भरधाव ट्रकच्या धडकेत चार जण जखमी

0

भुसावळ । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरून शहरातील कुटुंब जखमी झाल्याची घटना हॉटेल यशवंत समोर सोमवार 5 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. अरुण मुकुंदा सातदिवे हे दुचाकी (एम.एच. 19 सीबी 4643) वरून वरणगावहून जळगावकडे जात असताना पाठीमागून आलेला भरधाव ट्रक (डब्ल्यूबी 23 सी 9162) ने जोरदार धडक दिल्याने अरुण सातदिवे गंभीर जखमी झाले तर त्यांची पत्नी सीमा तसेच दीक्षा दीपक अहिरे (वय 4, रा. नंदुरबार) व कोमल विजय साळवे (12, ठाकूर नगर, जळगाव) जखमी झाल़े ट्रक चालक अपघातानंतर पसार झाला.