भुसावळच्या नाहाटा चौफुलीवर अपघात
भुसावळ – वरणगावकडून जळगावकडे जाणार्या भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नाहाटा चौफुलीवर घडली. ट्रक (क्रमांक एम.एच.20 सी.टी.8080) हा भरधाव वेगाने जळगावकडे जात असतांना दुचाकीवर आदळला. या अपघातात अनोळखी दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यास उपचारार्थ खाजगी दवाखान्यात हलवण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून बाजारपेठ पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात जमा केला आहे. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाला नसल्याचे सुत्रांनी सांगितले.