भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

0

रावेर: बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गावरील पारशाच्या नाल्यावर भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास झाला. भरधाव ट्रक (आर.जे.11 जी.ए. 9896) ने समोरून येणार्‍या दुचाकीस्वारास धडक दिल्याने सोपान महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. महाजन हे पत्नी व मुलीसह निंभोर्‍याकडे जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी दुपारपर्यंत अपघाताची नोंद झाली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.