भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार, तीन गंभीर

0

सांगवी बु.॥ गावाजवळ अपघात ; ग्रामीण रुग्णालयात गर्दी

यावल : तालुक्यातील सांगवी बु.॥ गावाजवळ भरधाव अज्ञात ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवर बसलेले चारही जण नदीच्या पुलावरून खाली कोसळले. शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात प्रदीप विलास सोनवणे (17) हा जागीच ठार झाला तर धम्मदीप कमलाकर बाहरे (12) व शिवम दिलीप तायडे (17) व दुचाकीस्वार सुरेश सुनील अडकमोल (सर्व रा. सांगवी बु.॥ ) हे गंभीर जखमी झाले. जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात हलवल्यानंतर उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.