हिंजवडी : भरधाव जाणार्या ट्रकने दिलेल्या धडकेत पायी चालत जाणार्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास हिंजवडीतील मेझा नाईन ते लक्ष्मी चौकाकडे जाणार्या रस्त्यावर घडली. विष्णूदास अंबादास शिंदे (वय 26, रा. भोईरवाडी, माण) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत विष्णूदास शिंदे याच्या भावाने फिर्याद दाखल केली आहे. भावाने नोंदविली फिर्याद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास विष्णूदास शिंदे हा मेझा नाईन ते लक्ष्मीचा चौकाकडे जाणार्या रस्त्यावरून पायी चालत जात होता. त्याचवेळी भरधाव जाणार्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने विष्णूदास शिंदे याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर विष्णूदास याचा भाऊ आकाश शिंदे याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.