भरधाव ट्रकच्या धडकेत २६ वर्षीय मजूर ठार

0

रावेर शहरातील महामार्गावर पहाटच्या सुमारास घटना

रावेर – भरधाव ट्रकने एका २६ वर्षीय युवकाला मजूरीला जात असतांना समोरून धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे रावेर शहरातील बराहाणपुर-अंकलेश्वर महामार्गावर घडली. या अपघातात साबिर खान हमीद खान उर्फ़े बादल ( २६, रा.मदीना कॉलनी) हा मयत झाला. तो आज सकाळी साडे चारच्या सुमारास मोलमजूरी करण्यासाठी जात होता. येथील बुरहानपुर जेलेबी सेंटर जवळ भरधाव वेगाने सावद्याकडून बुरहानपुरकडे जाणारा ट्रक (क्र एच आर ६९ बी ५६१६ ने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात साबिर खान याचा जागेच मृत्यु झाला.

मयताचे चुलत भाऊ आसिफ खान अरमान खान (रा. मदीना कॉलनी) यांच्या फिर्यादिवरुन रावेर पोलिसात भादवी कलम ३०४ अ प्रमाणे ट्रक चालक हकीम खान जमालमुद्दी खान, रा.जयसिंगपुर जि.मुहू (हरियाणा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करून अटक् करण्यात आली आहे . पुढील तपास पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.

कर्ता पुरुष गेला

रमजान महीना असल्याने साबिर हा पहाटे रेती भरण्याचे काम करत होता तर सकाळी आठ वाजे नंतर येथील प्रमोद लोणारी यांच्या चहा टपरी वर काम करून घरचे चरितार्थ चलावत होता त्यांच्या मृत्यु बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मयत साबिर याला पत्नी एक दोन वर्षाचा तर एक सहा महिन्या मुलगा आहे.