भरधाव ट्रकने कारला उडवल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू

0

पारोळ्याजवळ पहाटे भीषण अपघात ; मृतांमध्ये पाचोर्‍यातील एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

पारोळा- लग्न समारंभ आटोपून पाचोर्‍याकडे परतणार्‍या वर्‍हाडाच्या कारला समोरून येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पाचोर्‍यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती असून गंभीर मयतांमध्ये
पाचोर्‍यातील दत्त कॉलनीतील अलहित (वाणी) कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. जळगाव-धळे मुहामार्गावरील मोंढाळे गावाजवळ शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. पाचोर्‍यातील बंडू महाजन यांच्या भाचीचे शुक्रवारी लग्न आटोपल्यानंतर वर्‍हाडी शनिवारी पहाटे पाचोर्‍याकडे परतत असताना हा अपघात झाला. ट्रकची धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. मृतांमध्ये तीन महिलांसह दोन पुरूषांचा समावेश आहे.

ट्रकच्या धडकेत कार उलटली
पारोळ्याकडून धुळ्याकडे जाणारा ट्रक (एम.एच.18 बी.ए.0254) ने समोरून येणार्‍या मारोती इको (एम.एच.19 सी.यु.3980) कारला जबर धडक दिल्याने या अपघातात कार चालक चेतन नारायण महाजन (दुसखेडा, ता.पाचोरा), शांताबाई सुधाकर अलई (वाणी), प्रीतम बागड, अनिता रमेश अलई (वाणी), नीलिमा वाणी हे जागीच ठार झाले तर शीतल वाणी, रमेश वाणी, बंडू वाणी, दीपाली वाणी व अन्य सहा वर्षांची मुलगी जखमी झाली. जखमींवर धुळे येथे उपचार सुरू आहेत. बंडू यांच्या भाचीचे शुक्रवारी धुळ्यात लग्न असल्याने दहा नातेवाईक लग्नास गेले होते मात्र शनिवारी पहाटे परतीच्या प्रवासात या कुटुंबावर क्रुर काळाने घाला घातला.