पाचोरा। शहराबाहेरून जाणार्या मुंबई-नागपूर महामार्गावरील जारगाव चौफुलीवर पाचोर्याकडे तुरीची दाळ घेऊन येणार्या ट्रकचा आरटीओचे कर्मचारी पाठलाग करीत असतांना ट्रक जारगाव चौफुलीवर येताच ताबा सुटल्याने सरळ वडापाव दुकानावर येवून धडकला त्या ठिकाणी वडापाव खाणार्या दोन जण ट्रकच्याखाली आल्याने जागीच ठार झाले.
चौफुलीवरील अतिक्रमणामुळे दोघांचा बळी
वडापाव विक्रेते देवराम कोळी व भिकुबाई कोळी या वृद्ध दाम्पत्य ट्रक अपघातातगंभीर जखमी झाले आहे. पोलिस उपअधिक्षक केशव पातोंड, पोलिस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांनी त्वरीत घटनास्थळी गाठून अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेवून परिस्थिती नियंत्रित केली. जारगाव चौफुलीवरील वाढत्या अतिक्रमणामुळे अपघात व हानी वाढत असून हे युवक अतिक्रमाणाचेच बळी ठरले आहेत.
आरटीओ कर्मचार्यांचा काढता पाय
ही घटना घडल्यानंतर आरटीओ पथक घटनास्थळी न थांबता जळगावकडे निघुन गेल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे. पाचोर्याकडे येणारा एम.एच. 04 बी.के. 2047 या ट्रकने जारगाव चौफुलीवर असलेल्या एम.एच. 19 बी.के. 5788 हा एम.एच. 19 बी.एन. 367 या मोटारसायकल स्वारांना चिरडले. संदीप निंबाळे (वय 25) रा. पाचोरा व विनोद मेटकर (वय 27) रा. बिल्धी या दोघं युवकांचा अपघातात जागीच मृत्यु झाला.