भरधाव ट्रक समोरा-समोर धडकले ; दोन्ही चालक जखमी

0

यावल- भरधाव ट्रक समोरा-समोर धडकून झालेल्या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर मार्गावरील यावल-किनगावदरम्यानच्या वाघोदा गावाजवळ घडली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचेे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दोन्ही जखमी चालकांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. चोपड्याकून यावलकडे जाणाा कंटेनर (क्रमांक यू.के. 04 सी.ए.9322) ला विरुद्ध दिशेने जाणारा ट्रकची समोरा-समोर धडकले. या अपघातात चालक मोहम्मद उमर सलील चौधरी (55, मेरठ) व मोहम्मद सईद (50, नागपूर) हे जखमी झाले. जखमी चालकांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने स्थानिक रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. दोन्ही वाहनांमधील क्लीनर किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले.