भरधाव ट्रालाची दुचाकीला धडक : भुसावळातील भावंडांचा मृत्यू

भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी असलेल्या दोघा भावंडांचा भरधाव ट्रालाने धडक दिल्याने मृत्यू झाला. हा अपघात महामार्गावरील ट्रॅक्टर शोरूमजवळ गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास झाला झाला. दोघा भावंडांच्या अपघाती मृत्यूमुळे सिंधी कॉलनीत शोककळा पसरली. शहरातील सिंधी कॉलनी येथील जुन्या प्रायमरी स्कूलजवळील रहिवासी मनीष दर्डा (30) आणि रीतेश दर्डा (26) हे जळगावकडून भुसावळकडे मोटरसायकलने येत असताना ट्रॅक्टर शोरूमजवळ ट्राला (जी.जे.12 वाय 8106) ने धडक दिल्याने भावंडांचा मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच सिंधी कॉलनीमधील सिंधी बांधवांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मनीष आणि रितेश हे दोन्ही बंधू जळगाव येथे व्यवसाय सीसीटीव्ही कॅमेरा विक्रीचा व्यवसाय करतात. तेथून ते भुसावळ येथे येत असतांना हा अपघात घडला. अपघाताचे वृत्त समजताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकार्याने धाव घेतली.