मुक्ताईनगर- भरधाव ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक तथा शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना बुधवार, 31 रोजी दुपारी 12 वाजता
वडवे शिवारात घडली. या अपघातात महेश गजानन महाजन (36, रा.चिंचोली, ता.मुक्ताईनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. मृत महाजन हे बुधवारी शेतामध्ये ट्रॅक्टर व पेरणी मशीन गेल्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेतातून घराकडे परतत असताना वडवे शिवारात त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाले व ट्रॅक्टरखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीराम महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात मयत महेश महाजन यांच्याविरुद्ध स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास विनोद हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहेत.