भरधाव डंपरच्या धडकेत मलगावच्या आदिवासी तरुणाचा मृत्यू

0

बामणोद गावाजवळील घटना ; डंपर चालकाविरुद्ध गुन्हा

फैजपूर- मजुरीसाठी दुचाकीवरून भुसावळकडे जाणार्‍या एका आदिवासी तरुणाचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना बामणोद येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. हिरालाल रघुनाथ बारेला (25, रा.मलगाव, ता.झिरण्या, जि.खरगोन, मध्यप्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे. हिरालाल हा आपल्या विना नंबरच्या दुचाकीने आपल्या गावाकडून भुसावळकडे मजुरीसाठी जात असताना बामणोद गावाजवळील विविध कार्यकारी सोसायटीसमोर डंपर (एम.एच.19 झेड.2852) याने जोरात धडक दिल्याने या अपघातात हिरालालचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ व पोलिस कॉन्स्टेबल रमण सुरळकर यांनी तातळीने घटनास्थळी दाखल होत हिरालालचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलविला. अपघातग्रस्त वाहने फैजपूर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. या अपघात प्रकरणी रेमसिंग बारेला याने खबर दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.