भरधाव डंपरने बालकाला चिरडले!

0

जळगाव। काकासोबत कचरा टाकण्यासाठी गेलेल्या बालकाचा घरी परतत असतांना भरधाव येणार्‍या डंपरने चिरडल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाला. दक्ष कैलास भदाणे (वाणी) असे मयत बालकाचे नाव असून ही घटना बुधवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास निमखेडी रस्त्यावर घडली. घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने डंपरच्या काचा फोडून डंपर पेटवून दिला. यात डंपरची कॅबिन पूर्णत: जळुन खाक झाली. तर या घटनेत डंपरचालक गाडी सोडून पळ काढला.

घटनेनंतर चालक फरार
निमखेडीजवळील हितवर्धनी सोसायटीत कैलास दगडू भदाणे (वाणी) हे आई-वडील, पत्नी तसेच तीन भावांसह एकत्र राहतात. घरापर्यंत महानगरपालिकेची घंटागाडी येते नसल्याने बुधवारी सकाळी कैलास भदाणे यांचा तीन वर्षीय मुलगा देवांश उर्फ दक्ष हा काका विनोद व चुलत भाऊ धिरज, यश यांच्यासोबत निमखेडी रस्त्यावर कचना टाकण्यासाठी घराबाहेर पडला होता. सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास कचरा टाकल्यानंतर घराकडे परतत असतांना निमखेडी कडून भरधाव येणार्‍या एमएच.19.वाय.3757 या वाळु डंपरने दक्ष याला चिरडले. डंपरचे मागचे चाक देवांशच्या कमरेच्या खालून गेल्याने केवळ पायाचे बोट देवाशंचे दिसत होते. घटना घडताच नागरिकांनी धाव घेत देवांशला तत्काळ रिक्षात टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी एक तास देवांशचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केला. परंतू अधिक रक्तस्त्राव गेल्याने देवांशचा अखेर मृत्यू झाला होता.

एका तासाने पोलिस घटनास्थळावर
चिमुकल्याचा चिरडलेल्यानंतर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी डंपरचालक ट्रॅक सोडून फरार झाला होता. घटना घडल्यानंतर याच परिसरातील नागरिकांनी तालुका पोलिस स्टेशनला घटनेची माहिती दिली. परंतू एक सात उलटल्यानंतर पोलिस घटनास्थळावर आले. माहिती देवून ही पोलिस उशिरा आल्याने नागरिक रोष यावेळी व्यक्त करीत होते. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हाची नोंद केली असून पालिस डंपर कोणाचे, फरार झालेला डंपर चालक कोण होता याचा तपास पोलिस घेत आहे.

संतप्त जमावाने डंपर पेटविला
घटना घडताच डंपरचालका घटनास्थळावरून फरार झाला. घटनेनंतर मोठ्या प्रमाणात जमाव परिसरात जमला होता. त्यानंतर संपप्त जमावाने डंपरची तोडफोड करून काचा फोडल्या आणि डंपरला पेटवून दिले. यातच डंपरची कॅबिन जळून पुर्ण खाक झाली. दरम्यान, घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहिती नुसार डंपरचालक सत्तर ते ऐंशीच्या भरधाव वेगाने जात होता. त्यातच मोबाईलवर बोलत असताना तो गाडी चालवत असताना त्याच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा जीव गेला असे नागरिक बोलत होते. तर दक्ष याच्या मृत्यूमुळे निमखेडी परीसरात शोकाकुल वातावरण पसरले होते.

तिसरी घटना…..
निमखेडी रस्त्यावर दिवस-रात्र गिरणा नदीच्या रेतीच्या ठिय्यांवरून वाळुचा उपसा सुरू असतो. त्यामुळे दिवस-रात्र रेतीचे डंपर व ट्रॅक्टर या रस्त्यावरून भरधाव वाहत असतात. त्यामुळे या रस्त्यावर कायम रेतीच्या डंपर, ट्रॅक्टर चालकांकडून अपघात होत असतात. यापूर्वी जुनी जैन फॅक्टरी जवळ, निमखेडी रस्त्यावरील एका जागेवर दोन जणांचा अपघातात जीव गेला होता. त्यात आज तीन वर्षाचा देवांशचा जीव गेला आहे. तसेच दक्ष याच्या पश्‍चात वडील कैलास, आई अर्चना, आजी इंदूबाई भदाणे, आजोबा दगडू तसेच काका प्रदिप, शेखर, विनोद, चुलत भाऊ यश,धिरज असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.