भरधाव डंपर उलटला : चालक गंभीर जखमी

यावल : तालुक्यातील डांभुर्णी गावाजवळ डांबरीकरणाचे हॉट मिक्स वाहतूक करणारा भरधाव डंपर उलटल्याने वाहन चालक गंभीर जखमी झाला. सोमवार, 28 जुन रोजी हा अपघात झाला. किनगाव ते डांभुर्णी मार्गावरील डांभुर्णी गावाजवळ किनगावकडुन डांभुर्णी गावाकडे जाणारा डंपर (एम.एच 19 वाय.5718) डांबरीकरण कामाचे हॉट मिक्स हे साहित्य घेवुन जात असताना पावसामुळे वाहन रस्त्याच्या कडेला जावून उलटले. या अपघातात वाहनचालक हा गंभीर जखमी झाला. डंपर चालकास उपचारासाठी जळगावी हलवण्यात आले. या अपघाताबाबत पोलिसात नोंद नसल्याचे सांगण्यात आले.