भरधाव दुचाकीच्या धडकेत चाळीसगावातील दुचाकीस्वार गंभीर

चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील दुचाकीस्वार अज्ञात दुचाकीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाला. हा अपघात धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील राजस्थानी चौधरी ढाब्याजवळ घडला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी स्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत ज्ञानोबा कुणकुरे (34, रा.नेताजी चौक, चाळीसगाव) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा
प्रशांत ज्ञानोबा कुणकुरे (34) हे चाळीसगाव तहसील कार्यालयातील महसूल विभागात नोकरीला आहे. सोमवार, 28 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीवरून धुळे ते चाळीसगाव रस्त्यावरील राजस्थानी चौधरी ढाबाजवळून जात असताना समोरून दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.ए.2495) वरील अज्ञात चालकाने परीस्थितीकडे दुर्लक्ष करून चुकीच्या मार्गाने येवून प्रशांत कुणकुरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रशांत कुणकुरे यांना गंभीर दुखापत झाली. चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक जयंत सपकाळे करीत आहे.