भरधाव दुचाकीच्या धडकेत तीन जखमी

0

पिंपरी : भरधाव मोटारसायकल चालवून इतर वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी दुचाकीस्वार अजित सुरेश गिलबिले (वय 22, रा. पवनानगर, काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अजित दुचाकीवरुन धरधाव वेगाने जात असताना, त्याची रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या सहा दुचाकींना जोरदार धडक बसली. त्यानंतर जवळच्या चारचाकीला धडक बसल्याने या चारचाकीचा बॉनेट व काचा फुटल्या. या वाहनामधील नामदेव चुडामन पाटी, त्यांची पत्नी व मुलगी असे एकूण तीन जण जखमी झाले. या अपघातात चारचाकीचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.