कल्याण : कल्याण पुर्वेकडील चिंचपाडा रोड रामकृष्ण नगर नवजी अंबिका दर्शन सोसायटी मध्ये राहणार्या नितादेवी सिंग काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास याच परिसरातील एक बँकेच्या एटीएम समोरून जात असताना अचानक पाठीमागून येणार्या भरधाव दुचाकीने त्याना धडक दिली.
या अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाल्याचे पाहून या दुचाकीस्वाराने तेथून पळ काढला .या प्रकरणी सदर महिलेने कोळशेवाडी पोलीस स्थानकात एम एच 05 एआर 965 या दुचाकींचा नाम्बर देत तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे