भरधाव दुचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू : मयत हनुमंतखेडे गावातील रहिवासी

A Youth from Hanumantkhede Died On The Spot in A Two-Wheeler Accident Near Yawal यावल : किनगाव-चोपडा रस्त्यावर भरधाव दुचाकीला अपघात झाल्याने हनुमंतखेडे, ता.एरंडोल येथील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 17 सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता घडला होता. या प्रकरणी यावल पोलिसात मयत दुचाकीस्वाराविरोधात स्वतःच्या मरणाला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

भरधाव दुचाकी घसरून अपघात
शनिवार, 17 रोजी रात्री गोपाळ हिरामण कुंभार (22, हनुमंतखेडे) हा तरुण दुचाकी ग्लॅमर (एम.एच.40 व्ही.5908) ने जात असताना किनगाव-चोपडा रस्त्यावरील वीज कंपनीच्या कार्यालयासमोर दुचाकी घसरून अपघात झाल्याने तरुणाचा मृत्यू ओढवला होता.

यावल पोलिसात गुन्हा
या प्रकरणी दीपक प्रकाश नेवासकर (40, किनगाव बु.॥) यांच्या फिर्यादीनुसार मयताविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय नितीन चव्हाण करीत आहेत.