भरधाव दुचाकी झाडावर आदळून एक ठार, एक जखमी

0

पारंबी फाट्यावर अपघात ; कुर्‍हाकाकोड्यात शोककळा

मुक्ताईनगर : भरधाव दुचाकी निंबाच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात कुर्‍हाकाकोडा येथील एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. कुर्‍हा-वढोदा रस्त्यावरील पारंबी फाट्यावर 11 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात शेख इरफान शेख यासीन (50, रा.कुर्‍हाकाकोडा) यांचा जागीच मृत्यू झाला तर युसूफशहा हुसेन शहा (कुर्‍हाकाकोडा) हे जखमी झाले. शेख इरफान हे दुचाकी (एम.एच.20 बी.एन.2357) ने जात असताना अपघात झाला. या प्रकरणी अफसरखा मन्सुरखा (55, रा.कुर्‍हाकाकोडा) यांनी फिर्याद दिल्यारून मयत शेख इरफानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुधाकर शेलोडे करीत आहेत.