Terrible accident on Shirpur-Shahada Road : Doctor killed on the spot, wife and four others injured शिरपूर : भरधाव वेगात असलेल्या दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होवून अपघातात डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. शिरपूर-शहादा रस्त्यावरील वरूळ येथे असलेल्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. या अपघात दोन बालके जखमी झाले. अपघातात डॉ.हरकलाल बाबूलाल चव्हाण (बलकुवे) असे मयत डॉक्टरांचे नाव आहे.
शिरपूर शहर पोलिसात नोंद
या अपघातात दुचाकीवरील भारतीबाई हरकलाल चव्हाण, स्वामी हरकलाल चव्हाण (7), शर्वरी हरकलाल चव्हाण (9, रा.बलकुवे) आणि सचिन छोटू पाटील (रा.भटाणे, ता.शिरपूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी वार्डबॉय लखन बुसिंगे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने वाहन अपघात व अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
भरधाव दुचाकी धडकल्या
रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हरकलाल चव्हाण हे शिरपूर-शहादा रस्त्याने भटाणेकडून आपल्या परीवारासह बलकुवेकडे येत असतांना भटाणे येथील सचिन पाटील याने दारूच्या नशेत भरधाव वेगाने दुचाकी (एम.एच. 18 ए.एच.5478) ने हरकलाल चव्हाण यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने हरकलाल बाबूलाल चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी व दोन मुले आणि धडक देणारा सचिन पाटील हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर नागरीकांनी त्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता हरकलाल चव्हाण यास डॉक्टरांनी मयत घोषित केले तर जखमीवर तात्काळ उपचार सुरू केले.पुढील तपास हवालदार मनोज साठे करीत आहे.