भरधाव दुचाकी नियंत्रण सुटल्याने खड्ड्यात : आईचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी

Purnad woman dies after bike collides with potholes : son injured रावेर : भरधाव दुचाकी नियंत्रण सुटल्याने खड्ड्यात गेल्याने आईचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला. हा अपघात रावेर-सावदा दरम्यान रविवार, 7 रोजी सायंकाळी सात वाजता घडला. या प्रकरणी मयताच्या मुलाविरोधातर रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकीअपघातात महिलेचा मृत्यू
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मोहन सुनील ठाकरे (पूरनाड, ता.मुक्ताईनगर) हा आई आशाबाई सुनील ठाकरे (45, पूरनाड, ता.मुक्ताईनगर) यांच्यासह दुचाकी (एम.एच.19 बी.डब्ल्यू.3727) ने रावेर-सावदा रस्त्यावरून जात असताना पंजाब शहा बाबा दर्ग्याजवळ भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती खड्ड्यात आदळल्याने आशाबाई ठाकरे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी मयताचे जावई शरद आकाश वानखेडे (35, विटवे, ता.रावेर) यांच फिर्यादीवरून दुचाकी चालक मोहन ठाकरे विरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक शीलकुमार नाईक करीत आहेत.