भरधाव दुचाकी बैलगाडीवर आदळली ; पित्यासह मुलगी जागीच ठार

धरणगाव : दुचाकीला अपघात झाल्याने पित्यासह मुलीचा मृत्यू झलाा. हा अपघात धरणगाव तालुक्यातील रोटवद गावाजवळ सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडला. या अपघातात दोन जण जखमी झाले. जखमींना धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

रोटवद गावाजवळ अपघात
प्रभाकर रघुनाथ सूर्यवंशी (35, रा.पिंपळगाव, ता.शिंदखेडा, जि.धुळे) हे पत्नी ममता सूर्यवंशी व दोन्ही मुले नायरा व मोहितसह धरणगावहून चोपडा चौफुली मार्गाने अमळनेरकडे दुचाकीने निघाले असतानाच रोटवद गावाजवळ अंधारात बैलगाडी न दिसल्याने त्यांची दुचाकी (एम.एच 18, एव्ही 5811) बैलगाडीवर मागून आदळली. या अपघातात प्रभाकर सूर्यवंशी व त्यांची मुलगी नायरा सूर्यवंशी (7) या बापभलेकीचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी ममता सूर्यवंशी व मुलगा मोहीत सूर्यवंशी हे जखमी झाले. जखमींना धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, सपोनि जितेंद्र पाटील, दीपक पाटील, विनोद संदानशीव, विजय धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली.