भरधाव पॅजो उलटल्याने दोघा तरुणांचा मृत्यू तर सात जखमी

0
पिंप्री येथे किक्रेट स्पर्धेला येणार्‍या तरुणांच्या पॅजो रीक्षाला अपघात
पाचोरा- पिंपळगाव हरेश्वर रस्त्यावर भरधाव पॅजो उलटून झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सात जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. सोयगाव तालुक्यातील निंबायती न्हावी तांडा येथील तरुण पिंपळगाव हरेश्वर गावाजवळील पिंप्री येथे क्रिकेट स्पर्धेसाठी येत असताना हा अपघात झाला. या अपघातात भरत शिवदास राठोड (20) व राहुल हरी जाधव (20, दोन्ही रा.निंबायती न्हावी तांडा, ता.सोयगाव) यांचा मृत्यू झाला तर अन्य सात जण जखमी झाले. जखमींमध्ये चेतन वसंत राठोड, अश्विन अरुण पवार, राजन पारस राठोड, दिनेश सुरेश पवार, सचिन हिरा राठोड, रवींद्र शिवदास पवार, दिनेश किसन राठोड यांचा समावेश आहे. दरम्यान माजी उपसरपंच कैलास फकिरा क्षिरसागर यांच्या शेताजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती काँग्रेसचे कार्यकर्ते राजू महाजन यांनी आरोग्य सेवा सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन सोमवंशी यांना कळवल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.किरण पाटील यांच्याशी संपर्क साधल्याने तातडीने जखमींवर उपचार करण्यास सुरुवात झाली.