मुक्ताईनगर- केळीने भरलेली भरधाव बोलेरो उलटल्याने त्या खाली बदले गेल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना महामार्गावरील हॉटेल फुलोराजवळ शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात बोलेरो चालक गजानन उदयभान कोळी (35, चांगदेव) यांचा मृत्यू झाला. चालक गजान हे बोलेरा पीकअप (क्रमांक एम.एच.14 जी.यु.6266) घेवून साकरी येथे केळी भरण्यासाठी गणेश कोळी व विजय बोदडे यांच्या सोबत गेले होते. केळी भरल्यानंतर परतीच्या प्रवासात रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करीत वाहन चालवल्याने ते महामार्गावरील हॉटेल फुलोराजवळ उलटल्याने त्याखाली दबले जावून चालकाचा मृत्यू झाला तर सोबतचे दोघे जखमी झाले. अपघातप्रकरणी संदीप देविदास तायडे (रा.चांगदेव, ता.मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हवालदार रघुनाथ पवार करीत आहेत.