भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

A young man from Jalgaon died on the spot after being run over by a speeding rickshaw जळगाव : शहरातील गोदावरी इंजिनिअरींग कॉलेज जवळील महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या रीक्षाने धडक दिल्याने जळगावातील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 23 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता घडला. या प्रकरणी सोमवार, 25 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता रीक्षा चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अभिषेक अशोक पथरोड (रा.आयटीआय समोर, जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

रीक्षाने दुचाकीला उडवले
जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्ग एमआयडीसी परिसरात असलेल्या अजित टायर जवळून अभिषेक पथरोड हा तरूण शहरात रविवार, 23 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास (एमएच 30 बीएन 4462) या दुचाकीने जात असताना समोरून भरधाव वेगाने येणार्‍या रीक्षा (एम.एच .19 सी.वाय.7903) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अभिषेक पथरोड हा जागीच ठार झाला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गोविंदा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. या प्रकरणी रीक्षा चालक समीर खान सांडू खान (उमर मज्जीदजवळ, मास्टर कॉलनी, जळगाव) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विजय पाटील करीत आहेत.