भरधाव वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर कलंडल्याने मजूर जखमी

0

भालशीव रस्त्यावर अपघात ; अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर

यावल- भरधाव वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला कलंडल्याने झालेल्या अपघातात गफ्फार हमदू पटेल (50) हे जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भालशीव रस्त्यावर घडली. संजय भगवान भोई यांचे ट्रॅक्टर वाळू घेऊन शहरात येत असताना खंडोबा मंदिराजवळ भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर कंलडल्याने ट्रॉलीवरील गफ्फार हमदू पटेल (बोरावल गेट परीसर, यावल) हे जखमी झाले. त्यांचा उजव्या पायाच्या कमरे जवळील हाड मोडले असून त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉ. शुभम जगताप, संगीता डहाके यांनी प्रथमोपचार करीत अधिक उपचारार्थ शस्त्रक्रियेसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.