धुळे- अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील बुडकी गावाच्या शिवारात घडली. शांताराम रामसिंग पावरा (45, रा. कोडीद, ता. शिरपूर) यांचा 14 वर्ष वयाचा मुलगा दिनेश शांताराम पावरा हा सोमवारी दुचाकीवर बसून बुडकी गावच्या सुमारास चांदसूर्या रस्त्यावरून जात असताना मागाहून येणार्या भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दिनेश याचा जागीच मृत्यू झाला. यादरम्यान वाहनचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.