भरधाव वाहनाने उडवल्याने शेतकर्‍याचा मृत्यू

अ‍ॅपेने रस्त्यावर उतरताच भरधाव चारचाकी वाहनाने उडवले : अत्यवस्थ अवस्थेत जळगावी हलवताना मालवली प्राणज्योत

यावल : तालुक्यातील कोरपावली-विरावली रस्त्यावर अ‍ॅपे रीक्षातून खाली उतरून शेतात जाणार्‍या 48 वर्षीय इसमाला चारचाकी धडक दिल्याने 48 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. फिरोज लतीफ तडवी (कोरपावली, ता.यावल) असे मयताचे नाव आहे.

शेतात जात असताना भरधाव वाहने उडवले
कोरपावली येथील फिरोज लतीफ तडवी हे अ‍ॅपेने कोरपावली येथून विरावली रस्त्यावरील एका शेतात केळी पाहण्यासाठी जात असताना रस्त्यावर उतरले व रस्ता ओलांडत असतांना यावलकडून मोहराळाकडे जाणार्‍या चारचाकी (क्रमांक एम. एच. 19 डी. व्ही. 7229) ने त्यांना जबर धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरून कार चालक याने स्वतः आपल्या कारमध्ये टाकून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरीता हलवले व प्रथमोपचार करण्यात आले मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला.