चाळीसगाव। पातोंडाकडून चाळीसगाव कडे भरधाव वेगाने येणार्या 407 वाहनाने तालुक्यातील पातोंडा ते चाळीसगाव दरम्यान वानरदेव मंदिरापुढे रोड वर मोटार सायकलला धडक दिल्याने मोटारसायकल वरील 65 वर्षीय वृद्ध फेकले जाऊन जागीच मृत्यू झाला असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.
धडक दिल्यानंतर वाहनचालक फरार
तालुक्यातील मुदखेड बु॥ येथील लक्ष्मण पोपट पाटील वय 65 हे वृद्ध त्यांची बजाज प्लॅटिना मोटारसायकल एम एच 19 बी झेड 2540 ने चाळीसगाव कडून मुदखेड बु कडे जात असतांना दि 20 मार्च 2017 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास चाळीसगाव ते पातोंडा रोड वरील वनरदेव मंदिरापुढे पातोंडा कडून चाळीसगाव कडे येणार्या 407 वाहन क्र एम एच 04 सी पी 5373 ने त्यांच्या मोटारसायकल ला समोरून धडक दिल्याने लक्ष्मण पोपट पाटील हे जोरात फेकल्या गेल्याने त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात होताच 407 वाहनचालकाने तेथे न थांबता पोलिसांना खबर न देता तेथून पलायन केले आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.