अहमदाबाद: गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांना एका व्यक्तीने कानशिलात लागावल्याची प्रकार घडला आहे. गुजरातच्या सुरेंद्र नगरमधील प्रचारसभेदरम्यान, एका अज्ञान व्यक्तीने हार्दिक पटेल यांच्या कानाशिलात लगावली. हार्दिक यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते गुजरातमधीलकाँग्रेस नेत्यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत.
आज सुरेंद्र नगर येथे सभा घेत असताना, स्टेजवरुन चढून एका मध्यमवयस्क व्यक्तीने हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्याप, त्या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, ती व्यक्ती भाजपाशी संबंधित असल्याचा आरोप हार्दिक यांनी केला आहे.