जळगाव । शहरातील भरारी फाऊंडेशनतर्फे महाबळ परिसरातील मायादेवी नगरात नवीनच बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाजवळ पंचवीस कडुंलिंबाच्या वृक्षांची जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते रोपण करण्यात आले. याप्रसंगी दलुभाऊ जैन, अभिजीत भांडे, अनिल भोकडे, अमोल निकम, नरेख खंडेलवाल, बाळासाहेब सुर्यवंशी, सपन झुनझुनवाला, संजय शहा, पंकज जैन, सदिप पगारिया, स्वरुप लुंका, सुनिल भंगाळे, डॉ. रूपेश पाटील, नगरसेविका अश्विनी देशमुख आदींची उपस्थिती होती.
यांनी घेतले परिश्रम
जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी वृक्षरोपणानंतर लावलेली झाडे ही योग्य पध्दतीने जगवीली गेली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपआपली मते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाळ शिंपी, रितेश लीमडा, पियुष मनियार, अनिल जावळे, दिपक परदेशी, चाणक्य जोशी, विशाल पाटील, रविंद्र भामरे, जहांगीर खान, योगेश हिवरकर तसेच अमेय जोशी, विनोद ढगे, योगेश चौधरी यासह भरारी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.