भर चौकात दे दणादण ! : पोलिसांनी धाव घेत दुकलीच्या आवळल्या मुसक्या

Clash at Gandhi Chowk in Rawer : Crime Against Two रावेर : शहरातील गांधी चौकात सार्वजनिक जागी दोघांनी एकमेकांना शिविगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार शनिवार, 10 रोजी सकाळी नऊ वाजता घडला. रावेर पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत संशयीतांना ताब्यात घेत शांतता प्रस्थापीत केली.

दोन संशयीतांविरोधात गुन्हा
या प्रकरणी कॉन्स्टेबल विशाल शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीनुसार, हरुन शहा इरफान शहा (फकिरवाडा, रावेर) व भाऊलाल सुनील शिंदे (शिवाजी चौक, रावेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक विष्णू भील करीत आहेत.