Racket of two-wheeler thieves active in Bhusawal : Two-wheeler in Vitthal Mandir Ward removed भुसावळ : शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील दर्पण झेरॉक्ससमोरून चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बाजारपेठ पोलिसात गुन्हा
तक्रारदार राजेश नारायणदास अग्रवाल (59, सराफ बाजार, बालाजी गल्ली, भुसावळ) यांनी आपले भाऊ संजय अग्रवाल यांच्या नावे असलेली पॅशन प्रो दुचाकी (एम.एच.19 बी.एच.1626) शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील दर्पण झेरॉक्ससमोर लावली असता चोरट्यांनी सोमवार, 17 रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेदरम्यान संधी साधत ती लांबवली. तपास हवालदार गीता कश्यप करीत आहेत.