भर पावसातही वडगावमध्ये मतदानासाठी रांगा

0

वडगाव मावळ – वडगाव कातवी नगरपंचायतची पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणुकीचे मतदान रविवारी पार पडले. सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असूनही मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारी दीड वाजेपर्यंत 53.12 टक्के मतदान झाले.

वडगाव कातवी ग्रुप ग्रामपंचायत बदलून मागील काही महिन्यांपूर्वी वडगाव कातवी नगरपंचायत करण्यात आली आहे. त्यानंतर होणारी ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यामुळे पहिला नगराध्यक्ष किंवा पहिला सदस्य होण्यासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी कंबर कसली आहे. निवडणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून भर पावसात मतदार जनता रेनकोट, छत्री घेऊन मतदानासाठी बाहेर पडले आहेत. ज्यांच्याकडे कार आहे, असे नागरिक शेजार्‍यांना घेऊन मतदान केंद्रावर जाताना दिसत आहेत. मतदान केंद्राबाहेर मतदार नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.