रेकव्हिक । आईसलँड येथे विश्वचषक समशेरबाजी स्पर्धेत भारताची स्पर्धक भवानी देवीने सॅब्रे प्रकारात सुवर्णपदक मिळविले. टूरनोई विश्वचषक सॅटेलाईट समशेरबाजी स्पर्धेत चेन्नईच्या भवानी देवीने अंतिम सामन्यात ब्रिटनच्या सारा जेनी हॅमसनचा 15-13 अशा गुणांनी पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. भवानी देवीने उपांत्य लढतीत ब्रिटनच्या जेसीका कॉरबायचा 15-11 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. भवानीने उपांत्य लढतीत ब्रिटनच्या जेसीका कॉरबायचा 15-11 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. विश्व समशेरबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी भवानी देवी ही पहिली महिला स्पर्धक आहे. भवानी देवीने विश्व समशेरबाजी स्पर्धेत तिसर्यांदा सहभाग दर्शविली. गेल्यावर्षी तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. सॅटेलाईट या प्रकारात भवानी देवीने यापूर्वी रौप्यपदक मिळविले होते.