भवानी मातेच्या जय घोषात बारागाड्या

0

जळगाव। भवानी माताकी जय , प्रेसम से बोलो जय माता दि अशा जय घोषात प्रिप्राळा गावात भवानी मातेच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. गेल्या 67 वर्षांपासून अक्षय्य तृत्तीयेला भवानी मातेचा उत्सव साजरा करण्यात येतो. संपूर्ण परिसरात उत्सवामुळे येतेच स्वरूप आले होते. गांवकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने यंदादेखील भवानीदेवी मंदिर, अहिर सुवर्णकार पंच मंडळ ग्रामस्थांतर्फे भवानीदेवीचा यात्रोत्सव बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भगत हिलाल भिल यांनी सायंकाळी 6. 40 वा महामार्गाजवळील रेल्वे उड्डाणपुलापासून बारागाड्या ओढण्यास सुरुवात करण्यात आली.

मेहरूण परिसरात बारागाड्या
मेहरूण परिसरातील शुक्रवार 28 एप्रिल रोजी भवानी मातेच्या यात्रा उत्सवानिमित्त श्रीराम मंदिर संस्था व गिरिजाशंकर फाउंडेशन च्या माध्यमातून बारागाड्याचे आयोजन करण्यात आले होते. 150 वर्षाची परंपरा असलेल्या बारागाड्या भगत मधुकर वाघ यांनी ओढल्या. यावेळी भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. प्रमुख मान्यवर म्हणून महापौर नितीन लढ्ढा, प्रशांत नाईक, चंद्रकांत लाडवंजारी आदी उपस्थित होते.

भक्ताची महिन्याभरापासून तयारी
भवानी मातेच्या यात्रौ उत्सवाच्या पूर्वसंध्येला हिलाल भील यांच्या घरी भगतकाठीची स्थापना करण्यात येते. यानंतर रात्री 12 वाजेच्या मध्यरात्री परिसरातील सर्व मंदिरावर देवांची पूजा करून त्यांना आमंत्रित करण्यात येते. या उत्सवासाठी गांवकरी व भवानी मंदिर संस्थान च्या वतीने महिनाभरापासून तयारीला सुरुवात झालेली असते. या उत्सवात जल्लोष पूर्ण नागरिक आपली जबादारी सांभाळताना उत्सवात सामील होतात. भगत पितांबर कुंभार ,ज्ञानेश्वर सीताराम धनगर, कौतिक धनगर ,लालचंद बोरसे, आनंद बोरसे,गोविंदा बोरसे,भिलाल बोरसे,नारायण बोरसे,कैलास बोरसे,आनंद बोरसे आदीं सहभागी होते.

1949 पासूनची परंपरा
पिंप्राळ्यातील उत्सवाला 1949 पासूनची परंपरा आहे. कै. भावडू टिंभा चौधरी यांनी बारागाड्या ओढण्याच्या उत्सवाला सुरुवात केली. 67 वर्षांपासून उत्सवाची परंपरा आजही कायम टिकून आहे. गेल्या पाच वर्षांपासून बारागाड्या भगत हिलाल भील ओढत आहेत. दहा मिनिटाचा थरार नागरिकांना घाबरविणारा होता. बारागाड्या ओढण्यास सुरुवात झाल्या नंतर पुढे पळणारे भाविक यामुळे मोठी धावपळ करीत बारागाड्या ओढण्यात आल्या होत्या. भवानी मातेच्या बारागाड्या ओढताना युवकांचा अधिक जल्लोष दिसून आला. भवानी मातेच्या बारागाड्या तलाठी कार्यालयापर्यंत गाड्या ओढून नेल्या. एकूण 14 मिनिटाचा थरार नागरिकांनी अनुभवला आहे.