भविष्यात मुंबईत पाणी टंचाई होणार नाहीच!

0

मुंबई । मुंबईकरांना लवकरच मुबलक स्वरूपात पाणी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार पालिकेने तीन प्रकल्पाअंतर्गत कामकाजाला सुरुवात केली असून सन 2041पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध केला जाईल, अशी माहिती जल अभियंता अशोककुमार तवाडिया यांनी दिली. मुंबईकरांंना दररोज 4500 दशलक्ष लीटर पाणी लागते. त्यापैकी मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, तुलसी, भातसा, विहार या सात धरणातून महापालिका 3900 दशलक्ष लीटर इतके पाणी रोज उचलते. यापैकी 150 दशलक्ष लीटर इतके पाणी ठाणे, भिवंडी आणि निजामपूरला दिले जात असून उरलेले 3750 दशलक्ष लीटर इतके पाणी मुंबईला पाठवले जाते.

आणखी तीन धरणे बांधणार, केंद्राच्या मिळाल्या परवानग्या
पालिकेने नागरिकांची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सात धरणाव्यतिरिक्त आणखी तीन धरणे बांधणार आहे. गारगाई धरणातून 440 दशलक्ष लीटर, दमणगंगा धरणातून 1865 दशलक्ष लीटर, पिंजाळ धरणातून 1865 दशलक्ष लीटर, असे एकूण 3170 दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याचे तावडिया म्हणाले.