पिंपरी – भांडणे करण्यापासून रोखणार्या तरुणाला टोळक्याने मारहाण करत त्याच्या मुलावर तलवारीने वार केला. हा प्रकार गुरुवारी (दि. 19) दुपारी तीनच्या सुमारास कुदळवाडी येथे घडला.
इम्रान खान (वय 26, रा. पूर्णानगर) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सात जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खान यांचे स्क्रॅप व किंग वजन काट्याचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी अज्ञात सातजण वजन काट्याच्या दुकानासमोर भांडण करीत होते. खान यांनी त्यांना ‘माझ्या दुकानासमोर भांडण करून नका’ असे म्हणत भांडणे करण्यास रोखले. या रागातून टोळक्याने खान यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी खान यांचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी आला. तेव्हा टोळक्यातील एकाने खान यांच्या मुलाच्या डोक्यात तलवारीने वार केला. यामध्ये खान यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही.