भांडण सोडविले म्हणून तरूणास लाठ्याकाठ्यांनी मारहाण

0

धुळे। शहरातील स्टेशन रोडवरील दसेरा मैदानाजवळ राहणार्‍या छोटू झुलाल अहिरे (वय 28) या हमाली काम करणार्‍या तरुणास लहान मुलांचे भांडण सोडवितांना इतरांनी लाठ्या काठ्या, तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात छोटू अहिरे जखमी झाला आहे. त्याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री 9 वाजेच्या सुमारास सह जीवन नगर येथे नवसाच्या गणपती मंदिराजवळ लहान मुलांचे भांडण सुरु होते.

हे भांडण छोटू अहिरेने सोडविले, या कारणावरुन विशाल सोनवणे, आकाश सोनवणे, गणेश सोनवणे, अमोल प्रविण सोनवणे, टिल्लु सोनवणे सर्व रा. सहजीवन नगर यांनी हातात तलवार,लोखंडी पाईप,लाठ्या काठ्या घेवून छोटुवर हल्ला केला.त्यात तो जबर जखमी झाला आहे. तर आकाश प्रविण सोनवणे (वय 18)रा.सहजीवन नगर,दुध डेअरी समोर,धुळे या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार लहान मुलांच्या भांडणात आकाश घोडे, छोटू अहिरे, सागर सर्व रा.रेल्वे स्टेशन रोड,धुळे यांनी कोणत्यातरी हत्यार्‍याने आकाशवर हल्ला करुन त्याला जखमी केले.तसेच मारुती कारची तोडफोड केल्यावरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.