भाई वैद्य यांचे विचार, आचार हे कायम स्मरणात राहतील

0

श्रमशक्ति भवन येथे आदरांजली सभेतील भावना

आकुर्डी : भाई वैद्य यांनी घालून दिलेली पायवाट पुढे नेण्याचे काम अविरत करण्याचा निश्‍चय करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्यावतीने शनिवारी आकुर्डी येथील श्रमशक्ति भवन येथे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व स्तरातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली.

अध्यक्षस्थानी स्वराज अभियान महाराष्ट्राचे प्रमुख मानव कांबळे होते. यावेळी ज्येष्ठ नेते मधू जोशी, माजी नगरसेवक राजा गोलांडे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, बजाज ऑटो संघटनेचे दिलीप पवार, माजी नगरसेवक मारुती भापकर, भाजपचे कुलकर्णी, पत्रकार अश्‍विनी सातव, नामदेव सोनवणे, अरुण बकाल, डी. वाय. एफ. आय.चे गणेश दराडे, बाबा मोहिते, प्रदीप पवार, गिरिधारी लड्डा आदी उपस्थित होते.

न भरून निघणारे नुकसान झाले
यावेळी मानव कांबळे यांनी भाईंच्या सहवासातील दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, भाईंच्या जाण्याने न भरून निघणारे नुकसान झाले आहे. सच्चा कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्ता कसा घडवावा याबद्दल भाई नेहमीच अग्रेसर रहायचे. विविध आंदोलनात आपुलकीने माहिती घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचे. मधू जोशी म्हणाले की, मानवी जीवनात अनेक लोक काम करतात. मात्र फोटोच्या चौकटीत आल्यावरच का त्यांची आठवण होते हे कळत नाही. हयात असताना ही तेवढेच प्रेम केले पाहिजे. यशस्वी व्याख्यानमाला करण्याचे तंत्र भाईकडून मिळाले असे राजाभाऊ गोलांडे यांनी सांगितले. तर बकाल यांनी भाडेकरू चळवळ व त्यातील कार्यकर्त्यांना मनपा निवडणूक लढवून जिंकून आणल्याचे उदाहरण सांगितले. सामुहिक श्रद्धांजलीने समारोप करण्यात आला.