भाऊसाहेब राऊत विद्यालयाच्या उन्हाळी अभ्यास वर्गाचे उद्घाटन

0

जळगाव। वाल्मीक नगरमधील नवीन बाल विकास प्राथमिक विद्या मंदिर येथे अखिल कोळी समाज परिषद, मुंबई संचलित भाऊसाहेब राऊत विद्यालयातर्फे आयोजित मोफत उन्हाळी अभ्यास वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी अखिल कोळी समाज परिषदेचे उपाध्यक्ष नगरसेवक कैलास सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दिपक घाणेकर, मनपा महिला व बालकल्याण सभापती कांचन सोनवणे, नगरसेवक जितेंद्र मुंदडा, संस्थेचे सहसचिव कमलेश सोनवणे, माजी नगरसेवक सुमन ठाकरे, समाजसेवक नितीन सोनवणे, रविभाऊ ठाकरे, चिंतामण जैतकर, मोहन शंकपाळ, राजूभाऊ सपकाळे, भगवान तायडे, प्रकाश सपकाळे, रतिलाल सपकाळे, संजय पाटील, कडूभाऊ सपकाळे, बानाबाई शेवाळे, वनाबाई जैतकर आदी उपस्थित होते.

स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करा
मोफत उन्हाळी वर्गाचे उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती मातेच्या पूजन माल्यार्पण व दिपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी दिपक घाणेकर यांनी स्वामी विवेकानंद विचारसुत्र सांगुन त्यानुसार प्रत्येकाने आचरण करावे असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले. या मोफत उन्हाळी अभ्यास वर्गात मराठी, गणित, इंग्रजी, वाचन, लेखन, व्याकरण, कला, व्यक्तिमत्व विकास, संस्कारक्षम गीते व क्रीडा यांचा समावेश करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचा सहभाग
परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांचा उर्त्स्फुत सहभाग असून त्यांना कैलास सोनवणे यांचेकडून लेखन साहित्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पी.आर.कोळी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नंदिनी खर्डेकर, ए.एस.बाविस्कर, एल.एस.तायडे, एस.एम.रायसिंग यांचेसह सर्व शिक्षक यशस्वीतेसाठी कामकाज पाहिले. सुत्रसंचालन व आभार विनोद कोळी यांनी मानले.